फ्रँकलिन टेंपल्टनने निधी बंद करण्यासाठी ई-मतदान प्रक्रिया पुढे ढकलली

मुंबई, दि. १० जून २०२०: फ्रँकलिन टेंपलटनच्या सहा खंडित कर्जरोखे मधील गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यासाठी जास्त काळ थांबावे लागेल. या फंड हाऊसने सहा योजनांची ई-मतदान प्रक्रिया पुढे ढकलली आहे. ई-मतदानाची ही प्रक्रिया ९ जूनपासून सुरू होणार होती.

टेम्पलटनच्या योजना बंद करण्याच्या निर्णयाला गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एका याचिकेनुसार मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या विश्वस्तांनी योजना बंद करण्यापूर्वी युनिटधारकांची मान्यता घेतली नाही. यानंतर कोर्टाने कंपनीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

फ्रँकलिट टेंपल्टनच्या प्रवक्त्याने सांगितले की, “९ ते ११ जून २०२० पर्यंत बंद असलेल्या योजनांसाठी ई-मतदान आणि १२ जून २०२० रोजी युनिटधारकांची बैठक पुढील सूचना होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.”

फंड हाऊस कोर्टाकडून दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे जेणेकरुन ते कर्जरोखे विकून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळावेत. २३ एप्रिल रोजी सहा कर्ज योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यांची एयूएम २६,००० कोटी रुपये होती. ई-मतदान प्रक्रियेमुळे फंड हाऊस यापुढे सिक्युरिटीज विकू शकत नाही. ते पैशाचे वाटप करू शकत नाही. तथापि, योजनांना परिपक्व कर्जात व्याज मिळणे सुरूच राहील.

फ्रँकलिनच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की योजनांना कूपन, परिपक्व सिक्युरिटीज आणि प्रिपेमेंट्सद्वारे गुंतवणूकीतून उत्पन्न मिळत राहील. एनएव्हीची घोषणा दररोज केली जाईल. “

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा