इंदापूर, १२ सप्टेंबर २०२० : सध्या कोरोनामुळे जगभरासह देशभरात हाहा:कार माजला आहे अनेक लोकांचे उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशातच ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत .सध्या डिजिटल पेमेंटचा मोठा गाजावाजा होत असतानाच काही खाजगी ॲप फोन पे ,गुगल पे, ऍमेझॉन पे आदींच्या माध्यमातून नागरिक बँकेत जाण्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी वापर करीत आहेत.
परंतु यामधून कट झालेले पैसे पुन्हा मिळविण्यासाठी नागरिक इंटरनेटची मदत घेत असतात आणि त्यामधूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. याबाबत न्यूज अनकट शी बोलताना इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील विलास पाटील यांनी सांगितले की ,मी सोमवारी गुगल पे द्वारे माझ्या सहकारी मित्राला दहा हजार रुपये पाठविले होते परंतु ते त्यांच्या खात्यात जमा न होता माझ्या खात्यातून कट झाले मला वाटले ४८ तासांमध्ये पुन्हा माझ्या खात्यात सदर रक्कम जमा होईल या आशेने मी दोन दिवस वाट पाहिली .
परंतु शुक्रवारी मी इंटरनेटवर गुगल पेज ग्राहक सेवा क्रमांकाची माहिती मिळवली. त्यानंतर संबंधित क्रमांकावर फोन करून त्यांना माहिती दिली त्या क्रमांकावरील व्यक्तीने आपणास कंपनीकडून फोन येईल आणि फोन आल्यानंतर समोरील व्यक्तीने ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर एक-दोन मेसेज पाठवले. आपले पैसे खात्यात जमा झाले की नाही याची खात्री करा असे देखील सांगितले पुन्हा मात्र त्यांनी तुमच्या जवळील एटीएम कार्ड स्कॅन करा असे सांगितल्याने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने मी तातडीने फोन ठेवून दिला.
पण फोन ठेवताच काही क्षणातच माझ्या खात्यातून पाच हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला मी तो मेसेज पाहतो ना तोच लगेच पुन्हा चार हजार रुपये असे एक दोन हजार करत तब्बल १३ हजार रुपये माझ्या खात्यातून काही समजण्याच्या अगोदरच काढले गेले होते.
मी पुन्हा त्या संबंधित क्रमांकावर फोन केल्यानंतर विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही सांगितलेल्या सूचनांचे आपण पालन केले नाही त्यामुळे आपल्या खात्यातून पैसे कट झाले. झालेल्या प्रकारामुळे शांत न राहता पाटील यांनी संबंधित तक्रार सायबर विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदविली आहे.
तसेच यापुढे देखील सामान्य नागरिकांनी अधिकृत बँकांच्या शिवाय इतर कोणत्याही ॲप वर विसंबून राहू नये असे मत त्यांनी न्यूज अनकटशी बोलताना व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे.