भोकरदन, १३ जानेवारी २०२४ : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भोकरदन तालुका असंघटित कामगार काँग्रेस कमिटीकडून मोफत सर्व रोग निदान शिबिर, नेञ तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन कॉंग्रेस असंघटित कामगार कार्यलयात करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन लाॅयन्स क्लबचे अध्यक्ष अमृतराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ञिबंकराव पाबळे व वयोवृद्ध रुग्णाच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास असंघटित कामगार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुखदेव रावळकर, किसान काँग्रेस सेलचे शालीकराम गावंडे, काँग्रेस सोशल मिडीयाचे विधानसभाध्यक्ष सोपान सपकाळ, माजी नगरसेवक रमेश जाधव, डाॅ. काळे व त्यांचे सहकारी, सलीम पठाण, अंकुश काळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व रुग्ण आणि नातेवाईक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे