माढा (सोलापूर), दि. २५ जून २०२० : कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊन परिस्थितीला टक्कर देत आहे. उपासमार होऊ नये म्हणून प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक महिन्याला एका व्यक्तीला पाच किलो मोफत धान्य देण्याचे शासनाचे धोरण ठरले आहे. यामध्ये आजपर्यंत रेशन कार्डधारकांना अशा प्रकारचे मोफत धान्य मिळाले परंतू रेशन कार्ड नसणाऱ्या नागरिकांना अद्याप धान्य मिळाले नव्हते.
माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील समाविष्ट गावातील रेशन कार्ड नसणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मे व जून महिन्यातील पाच किलो याप्रमाणे दोन महिन्याचे दहा किलो तांदूळ व त्या कुटुंबास दोन किलो हरभरा देण्यात सर्वत्र सध्या सुरुवात झालेली आहे.अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली
गावोगावच्या कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबाला रेशन कार्ड नसल्यामुळे मोफत धान्य मिळाले नाही व ज्यांनी अद्याप फॉर्म भरून दिले नाही अशा प्रत्येकाचे आधार कार्डची झेरॉक्स सहित फॉर्म भरून संबंधित फार्म पोहचवण्याची व्यवस्था करावी व कोणीही बिगर कार्डधारक मोफत धान्यापासून वंचित राहू नये याची जबाबदारी घ्यावी तसेच काही अडचण असल्यास माढा माळशिरस व पंढरपूर तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा किंवा डायरेक्ट माझ्याशी फोनवर संपर्क साधावा असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील