Free Fire गूगल प्ले स्टोअर वरून गायब? सरकारने 50 ॲप्सवर घातली बंदी – अहवाल

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022: गॅरेना फ्री फायर गेम 12 फेब्रुवारी रोजी ॲपल ॲप स्टोअर आणि Google Play Store वरून अचानक गायब झाली. या संदर्भात गारेना फ्री फायरकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अहवालानुसार, हा गेम अचानक गायब होण्याचे कारण म्हणजे सरकारचा निर्णय. ईटी नाऊच्या अहवालानुसार, सरकारने चीनमधील काही अँप्ससह 50 अँप्सवर बंदी घातली आहे.

सरकारने बॅन केले ॲप्स

2022 मध्ये पहिल्यांदाच सरकारने ॲप्सवर बंदी घातलीय. अशाप्रकारे 2020 पासून एकूण 270 ॲप्सवर बंदी घालण्यात आलीय. मात्र, बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सची अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 12 फेब्रुवारीपासून गारिना फ्री फायर गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून गायब आहे. फ्री फायर मॅक्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असली तरी हे व्हर्जन ॲप स्टोअरवर उपलब्ध नाही.

PUBG मोबाईलचं काय होणार?

रिपोर्ट्सनुसार फ्री फायरचं नाव बॅन केलेल्या ॲप्सच्या यादीत असू शकतं. यामुळंच हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल ॲप स्टोअरवरून हटवण्यात आलं आहे. मात्र, याविषयी अद्याप गारिना इंटरनॅशनल किंवा गुगल आणि ॲपलने कोणतीही माहिती दिलेली नाही.

अहवालानुसार, नुकत्याच प्रतिबंधित केलेल्या ॲप्सच्या यादीमध्ये 2020 मध्ये बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सच्या क्लोन अँप्सचाही समावेश आहे. लक्षात घ्या की 2020 मध्ये सरकारने TikTok, PUBG Mobile, PUBG Mobile Lite यासह अनेक अँप्सवर बंदी घातली होती. PUBG Mobile ने BGMI या नावानं भारतात पुन्हा प्रवेश केला असला तरी यावेळी गेमचे प्रकाशक Tencent नसून Krafton आहे.

दुसरीकडं, ज्या लोकांच्या फोनमध्ये आधीपासून फ्री फायर आहे, ते कोणत्याही समस्येशिवाय ते प्ले करण्यास सक्षम आहेत. बॅटल रॉयल गेमच्या सोशल मीडिया पेजवर याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा