सोलापुरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

सोलापूर, २ ऑगस्ट २०२०: सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. संपूर्ण जिल्ह्यात गंभीर परिस्थिती आहे. शासन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी नागरिक मात्र घाबरून गेलेले आहेत. त्यामुळे नागरिक दवाखान्यात देखील जायला घाबरत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये काही त्रास होत असेल तरी नागरिकांच्या मनात चिंता वाढते आणि ते दवाखान्यात जायचे टाळतात. पण अशाने काही त्यांचा त्रास कमी नाही होणार, उलट तो वाढलाच जाणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग व मुद्रासन सिटी नागरी आरोग्य केंद्र आणि मा. सुरेश (आण्णा) पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

उद्या दिनांक ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत गुरूदत्त तरूण मंडळ देवी मंदिर शेजारी भवानी पेठ, सोलापूर येथे हे शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी, प्रभाग क्रमांक ३ मधील सर्व गरजू नागरिकांनी उद्या या तपासणी शिबिरामध्ये ताप, सर्दी, खोकला तसेच इतर लक्षण युक्त रोगांचे मोफत औषधोपचार आणि तपासणी करून लाभ घ्यावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा