वसुंधरेवर प्राण्यांचा मुक्त संचार

कोरोना विषाणूमुळे पूर्ण जगात हाहाकार माजला आहे. आता परिस्थिती उलटी झाली आहे. निसर्गाच्या प्रकोपा समोर माणूस हतबल झाला आहे. इतर वेळेस वन्यप्राण्यांना पिंजऱ्यामध्ये डांबून ठेवणारा माणूस आज स्वतः च पिंजऱ्यामध्ये कैद झाला आहे. शेवटी काय तर जे करावे ते भरावे. जगात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे, कारखाने, वाहने, विमाने मानवनिर्मित प्रत्येक गोष्ट आज बंद आहे. एका विषाणूमुळे माणूस कितपत हतबल होऊ शकतो हे निसर्गाने सिद्ध करून दाखवले.

सर्व रस्ते ओसाड पडले आहेत. कसलाही आवाज नाही ना गर्दी नाही. सर्वत्र मोकळी हवा आहे आणि शांतता आहे. आता वन्य प्राण्यांना देखील असे वाटू लागले आहे की की हे जग त्यांचे देखील आहे. त्यामुळे ते दिलखुलासपणे रस्त्यांवर बिनधास्त फिरत आहे. एका व्हिडिओमध्ये जगातील वेळ वेगळ्या ठिकाणावरून टिपलेल्या प्रसंगांचे संग्रहण आहे. या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे वन्य प्राणी मनमोकळेपणाने आणि बिंदास रस्त्यावर धावत आहेत. माणसाने त्यांना राहण्यासाठी जंगले देखील ठेवली नाही एका छोट्याशा जागेत कोंडले गेलेले हे प्राणी आज सर्वत्र मुक्त संचार करत आहेत. माणूस मात्र आज पिंजऱ्यामध्ये कैद होऊन पडला आहे, पण या कैदेतून मानवाने एक गोष्ट तरी शिकली पाहिजे ती अशी की हे जग सर्वांसाठी आहे. जितका अधिकार माणूस इथे गाजवतो तेवढाच अधिकार या प्राण्यांचा देखील आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा