सोलापूर, दि.१२ मे २०२० : लॉकडाऊनमुळे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक असणाऱ्या पक्षांना कधी नव्हे इतका मुक्त संचार करावयास मिळत आहे. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणात घट झाल्यामुळे शेकडो किलोमीटरचे अंतर पार करुन आलेल्या स्थलांतरीत पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांचे आश्रयस्थान असणाऱ्या उजनी जलाशय परिसरात पक्षांचा मुक्त संचार दिसून येत आहेत.
उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील लोकांसाठी वरदान आहे. त्याचबरोबर हे धरण परिसर देशी विदेशी पक्ष्यासाठी नंदनवन समजलं जातं. या परिसरात थंडीच्या हंगामात अनेक परदेशी पक्षी येत असतात. देशी आणि स्थानिक स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने इथे हजेरी लावतात.
यंदाच्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे उजनीमध्ये पक्ष्यांसाठी अत्यंत पुरक अशा प्रकारचे वातावरण होते. त्यातच लॉकडाऊनची भर पडली.
मुबलक मिळणारे अन्न, निर्भय वातावरण यामुळे उन्हाळ्यात प्रजनन आणि वीण करणाऱ्या पक्ष्यांसाठी हा कालावधी अत्यंत पोषक आणि सुरक्षित बनला आहे. त्यामुळे येत्या काळात पक्ष्यांची संख्या वाढण्यास या लॉकडाऊनचा फायदा होणार असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: