भोकरदन मध्ये लाडकी बहीण योजनेचे मोफत ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज शिबीर

भोकरदन, जालना २३ जुलै २०२४ : भोकरदन शहरातील सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे मोफत ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज शिबीर घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रमाई नगर भोकरदन येथे आयोजीत शिबिरात हजारो लाभार्थी महिलांनी लाभ घेतला.

शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे .या योजने साठी लागणाऱ्या कागद पत्रा साठी लाभार्थी महिला आणि नागरिकांना अर्ज मोफत ऑनलाईन/ ऑफलाईन भरण्यासाठी धावपळ होत असल्यामुळे भोकरदन शहरातील सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळ च्या वतीने लाडकी बहीण योजनेचे मोफत ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी या शिबिराला भोकरदन शहरातील हजारो लाभार्थी महिलांनी प्रतिसाद देत लाडकी बहीण योजनेचे मोफत ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज दाखल केले आहे.

या योजनेचे अर्ज ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप भरला नाही त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक दिपक बोर्डे, प्रदीप जोगदंडे, सचिन पारखे, सोमनाथ बिरारे, अमित गुंटुक, विदिशा सुदाम मेश्राम, जय भोंगळे, अंजना पगारे यांच्या सह नगर परिषद कर्मचारी, लाभार्थी महिला, सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळाच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

न्युज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा