स्वातंत्र्य सैनिक दामोदर उसगावकर यांचा शासनाने केला सन्मान

ठाणे, दि. ९ ऑगस्ट २०२०:  नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सत्कार समारंभासाठी निवड करण्यात आलेले  स्वातंत्र्य सैनिक श्री. दामोदर सोहिरोबा  उसगावकर यांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्याकत आला. जिल्हाधिकारी ठाणे यांचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय दंडाधिकारी अविनाश शिंदे यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून दामोदर उसगावकर मुलीचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला.

दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त महामहीम राष्ट्रपती यांच्याकडून सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित केला जातो. यासाठी महाराष्ट्रातून १० स्वातंत्र्य सैनिकांची निवड केली होती. परंतु  कोविड-१९ प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेवून ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांना राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे बोलवण्यात येणार नाही, असे केंद्र शासनाने कळवले होते.

या परिस्थितीच्या अनुषंगाने,  सत्कार समारंभासाठी निवड करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान,  स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जाऊन त्यांना शाल वस्त्र देऊन करावा, असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे निर्देश होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील श्री उसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांच्या मुलीने हा सत्कार स्विकारला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा