पुणे, १४ नोव्हेंबर २०२२ : पुण्यात पीएमपीएमएलच्या बसचालकाला दुचाकी चालकानं बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. बससमोर अचानक दुचाकीस्वार आल्यानं पीएमपीएमएल बस चालकानं त्यांना हटकल. यावरून दुचाकीस्वारांनी पीएमपीएमएल बस चालकासोबत वाद निर्माण केला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आहे. दुचाकीस्वार आणि पीएमपीएमएल बसचालकाच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी केल्या आहेत.
या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये चालकाला चक्क चपलेनं मारल्याचं दिसत आहे. त्यानंतर हाणामारीचा हा प्रकार पाहून वाहक देखील बसच्या खाली उतरला. वाहकानं देखील मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यांच्या मध्ये अजुनही वाद निर्माण झाला. हा प्रकार सलग तिसर्या दिवशी घडला आहे. याप्रकरणी पोलिसांत दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या आहेत.
अधिक माहितीनुसार, एक पीएमपीएमएल चालक आणि दुचाकी चालकामध्ये पुणे स्टेशन परिसरात वाद झाला. पीएमपीएमएल चालकानं दुचाकीला ओव्हरटेक केल्यावरून हा वाद झाल्याची माहिती असून त्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. सतत होत असलेल्या घटनांमुळं प्रशासनाची या घटनांची गंभीर दखल घेतलीय. त्यांनी वाहन चालक किंवा मालक यांची काही तक्रार असेल तर त्यांच्याशी वादावादी करु नका. ०२०-२४५४५४५४ यानंबरवर त्यांनी तक्रार नोंदवा, असं आवाहन प्रशासनानं पुणेकरांना केलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड