फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना अज्ञात व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी लावली कानशिलात

फ्रान्स, ९ जून २०२१: फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आग्नेय फ्रान्स दौर्‍यावर असताना एकाने जाहीरपणे मारहाण केली. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या लोकांची चौकशी सुरू आहे.

असे सांगितले जात आहे की मॅक्रॉन दक्षिण-पूर्व फ्रान्समधील ड्रॉम क्षेत्राच्या दौर्‍यावर जात असताना ही घटना घडली. कोविड १९ साथीच्या आजारानंतर आयुष्य कसे सामान्य स्थितीत येईल याबद्दल बोलण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली.

व्हायरल व्हिडिओमध्ये मॅक्रॉन पांढर्‍या शर्टमध्ये समोर उभे असलेल्या लोकांच्या गर्दीकडे जाताना दिसतात. दरम्यान, कानशिलात मारणारा माणूस डाऊन विथ द मॅक्रोनिअन्स असे म्हणताना ऐकू येतो. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी आरोपींना घटनास्थळी पकडले.

अलीकडेच फ्रेंच सैन्यदलात सेवा देणाऱ्या एका गटाने अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना इस्लामविषयी सूचना दिली होती. हा गट म्हणतो की इस्लाम धर्मात सवलत मिळाल्यामुळे फ्रान्सचे ‘अस्तित्व’ धोक्यात आले आहे. फ्रेंच सैन्यात सेवा देणार्‍या सैनिकांच्या या गटाचे हे पत्र पुराणमतवादी मासिक Valeurs Actuelles मध्ये छापले आहे.

या मासिकामध्ये मागील महिन्यातही गृहयुद्धाचा इशारा देण्यात आला होता. नंतर फ्रान्सचे गृहराज्यमंत्री आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे निकटवर्तीय जेराल्ड डॅरमिनिन यांनी या पत्राला काहीजणांची ‘ कमकुवत युक्ती’ म्हटले. अज्ञात पत्रे लिहिणाऱ्या मध्ये “धैर्य नसल्याचा” मंत्र्यांनी आरोप केला होता.

फ्रान्समधील सिनेटने नव्या ठरावाच्या समर्थनार्थ मतदान केल्यावर एप्रिलमध्ये सोशल मीडियावर मुस्लिम समुदायाचा रोष निर्माण झाला होता. या ठरावात सार्वजनिक ठिकाणी १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे हिजाब (डोक्यावर पांघरूण घालणारे कपडे) घालण्यास बंदी घालण्याची तरतूद आहे. हा प्रस्ताव ‘अलगाववाद’ विधेयकाचा एक भाग आहे. हे अद्याप प्रभावी झाले नाही. यापूर्वी महिनाभरापूर्वी स्वित्झर्लंडच्या मतदारांनी बुरखा आणि निकाब बंदी घालण्यासाठी मतदान केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा