पुणे, १८ जुलै २०२०: पुण्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे.कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.मात्र काही पुणेकरांना परिस्थितीतीच काहीच गांभीर्य नसल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे. पुण्यात गेल्या १३ दिवसांमध्ये तब्बल ८ हजार ९७ नागरिकांवर कार्यवाही करण्यात आली आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर ४ तारखेपासून कार्यवाहीला सुरुवात झाली. पुण्यात ४ जुलै ते १७ जुलै दरम्यान पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. शहरात ठिकठिकाणी दीडशेपेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी सुरु आहे.यामधे विना मास्क फिरणाऱ्या तब्बल २,१३५ मोकाटांवर तसेच मोकाटपणे पायी फिरणाऱ्या आणि वाहनांवर फिरणाऱ्या तब्बल ३ हजार ६८९ नागरिकांवर कार्यवाही केली आहे.१,७८३ वाहनं जप्त करण्यात आली असून.तर ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या ९४६ नागरिकांवर कार्यवाही झाली.
सम आणि विषम या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ दुकानदार तर ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकानं सुरु ठेवणाऱ्या ६७ दुकानदार, दुकानात सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या ८ दुकानांवर तर वेगवेगळ्या कारणानिमित्त ५१ दुकानदारांवर हि कार्यवाही करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात १ हजार ६१३ नागरिक, १३ जुलै ते १७ जुलै तारखेच्या ५ वाजेपर्यंत ४ दिवसातील ही कार्यवाही आहे.
कलम १८८ अंतर्गत ७९४ कारवाया करण्यात आल्या आहेत.मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची ३९७ वाहनं जप्त करण्यात आली आहेत.तर ३२० नागरिकांना १४४ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर १०२ मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर या कार्यवाहीचा बडगा उगारण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी