‘फ्रॉस्ट इंटरनॅशनल’ मध्ये घोटाळा

मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीनंतर आता आणखी एका घोटाळ्याचे प्रकरण समोर येत आहे. फ्रॉस्ट इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव असून सीबीआयने या कंपनी आणि त्यांचे डायरेक्टर्स उदय देसाई आणि सुजय देसाईंसह १३ जणांविरोधात १४ सरकारी बँकेंची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.
ज्यामध्ये एका कंपनीवर सरकारी बँकेने मोठी रक्कम न भरल्यामुळे फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बँक ऑफ इंडियाच्या कानपूर ऑफिसच्या तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. कानपूर, दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरामध्ये या कंपनीसंबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यासोबत आरोपींच्याविरोधात लुकआऊट सर्कुलरही जारी करण्यात आले आहे.
या कंपनीचे रजिस्टर ऑफिस मुंबईत आहे. त्यासोबत बांगलादेश, चीन, सऊदी अरब, अमेरिका, कंबोडिया, स्वझरलँडसह इतर अनेक देशात ही कंपनी आयात निर्यात करते.
‘कंपनीच्या वस्तूंच्या खरेदीत आणि लेनदेन प्रकरणातही घोटाळा झाल्याचे दिसत आहे. कंपनी आणि त्यांच्या डायरेक्टर्सने बँकेसोबत तीन हजार ५९२ कोटींची फसवणूक केली आहे’, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा