अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज फळ मार्केट ला सुरुवात

माढा, सोलापूर ७ ऑक्टोबर २०२३ : घोडे बाजार व डाळिंब मार्केट मुळे देशभर प्रसिद्ध असलेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज फळ मार्केट ला सुरुवात झाली असून पेरू, सीताफळ, आंबा, बोर या फळांना शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

माळशिरस तालुक्यातील शेतकरी व फळ विक्रेत्यांच्या बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितिच्या भव्य शेड मध्ये फळ मार्केटला आज सुरुवात केली. आज पहील्याच दिवशी पेरू ला ८६ ते ११० रुपये भाव मिळाला आहे.

फळ मार्केट मध्ये माळशिरस तालुक्याबरोबरच माढा, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळे विक्रीस आणली होती. तर अकलूज, कलकत्ता, उत्तर प्रदेश, बिहार, सांगोला, पंढरपूर, इंदापूर येथील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेतला. यावेळी सभापती मदनसिंह मोहिते पाटील, संचालक नितीन सावंत, सचिव राजेंद्र काकडे, शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा