समृद्धी महामार्गावर फळाच्या वाहनाचा अपघात; चालक जागीच ठार

जालना २२ ऑगस्ट २०२४ : समृद्धी महामार्ग नागपूर कॉरिडॉरवर बदनापूरनजीक आज पहाटे नाशिकहून नागपूरकडे जाणाऱ्या फळाच्या वाहनाचा अपघात झालाय. याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक आर. के. निकम यांच्यासह पोलीस अंमलदार ठोंबरे, परसुवाले, तसेच मसुपचे निखिल बोडखे, लहू जाधव यांनी घटनास्थळी तात्काळ जाऊन मदतकार्य केले.

टाटा सुप्रो मिनी पिकअप वाहन (क्रमांक MH 15 HH 8434) चालक उमेश भीमराव बनसोड (रा. शिवाजीनगर नाशिक) हे नाशिक ते अमरावती जात होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर चाललेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकून सदर अपघात झाला आहे. या अपघातात चालक उमेश भीमराव बनसोड हे ठार झाले. त्यांना तात्काळ समृद्धी ॲम्बुलन्समधून सामान्य रुग्णालय जालना येथे हलविण्यात आले आहे. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन हायड्राच्या साह्याने रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघातग्रस्त वाहनांमध्ये ड्रॅगन फ्रुट, आलु बुखरा ही फळे असून हे वाहन समृद्धी हायड्राच्या साह्याने एडमिन बिल्डिंग येथे आणून उभे करण्यात आले आहे. पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना फोन करून कळवले आहे. तसेच, फळ मालकाला फोन करून तात्काळ सदर माल घेऊन जाण्याचे कळविण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा