एफटीआयआय’च्या परीक्षा शुल्कात कपात

पुणे: एफटीआयआय’ आणि ‘एसआरएफटीआय’तील प्रवेश परीक्षा व अभ्यासक्रमाच्या शुल्कात वाढ केली होती. त्यामध्ये एका अभ्यासक्रमाच्या एका प्रवेश परीक्षेसाठी चार हजार, दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आठ, तर तीन अभ्यासक्रमांसाठी १० हजार शुल्क घेतले जाणार होते. तर, शैक्षणिक शुल्क सुमारे १ लाख १८ हजार रुपयांच्या घरात गेले होते पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि कोलकता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय) प्रवेश परीक्षेच्या शुल्कवाढीला विद्यार्थ्यांनी केलेल्या विरोधामुळे नमते घ्यावे लागले आहे.

या विरोधामुळे संस्थांना बैठक घ्यावी लागली होती. दोन्ही संस्थांच्या नियामक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली होती. त्यामध्ये अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कातील फेरविचारा बाबत निर्णय झालेला नसला, तरी प्रवेश परीक्षेचे शुल्क कमी करण्यात आले आहे. त्यानुसार एका अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी २ हजार रुपये शुल्क असेल, तर दोन अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी ३ हजार, तर तीन अभ्यासक्रमांसाठी ४ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांनी हा निर्णय होण्यापूर्वी प्रवेश परीक्षेचा अर्ज भरला होता त्यांची त्यांनी भरलेली अधिकची रक्कम परत केली  जाणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हा अर्ज भरण्यासाठी ८ डिसेंबर पासून सुरावट होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी पर्यंत देण्यात आली आहे. तसेच प्रवेशपत्र मिळण्याची तारीख ५ फेब्रुवारी व परीक्षेची तारीख १५ आणि १६ फेब्रुवारी असणार आहे. दिलेल्या माहितीनुसार निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा