जि. प. प्रशाला बाभुळगाव (गाढे) येथे तणावमुक्त परीक्षेचे शिबीर संपन्न

भोकरदन, २१ फेब्रुवारी २०२४ : भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव (गाढे) जि. प. प्रशाला येथे ब्राईट काॅम्प्यूटर व MKCL च्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा देतांना कुठले तंत्र वापरावे?, तणावाचे नियोजन कसे करावे?, उत्तर पत्रिका कशी सोडवावी?, उत्तर पत्रिकेवर लिहितांना काय काळजी घ्यावी?, वेळेचे अचूक नियोजन कसे करावे?, पेन कोणता वापरावा? तसेच परीक्षेमधे काॅपी करू नये तसेच दहावी नंतर विद्यार्थ्यांना कुठल्या संधी उपलब्ध आहेत या विविध विषयांवर तज्ञांनी शालेय विद्यार्थ्यांना सखोल व अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विशाल गाढे बोलतांना म्हणाले की, या शिबीरामुळे इयत्ता दहावीच्या मुलांमधे शालांत परीक्षेविषयी असलेल्या शंका व भिती दूर होण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. यावेळी MKCL च्या वतीने कृष्णा मिसाळ, श्री समर्थ काॅम्प्यूटरचे संचालक अनिल चिने सर व ब्राईट काॅम्प्यूटरचे संचालक शफिक शहा सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सहाणे सर, पवार सर, इतर शिक्षक तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी हजर होते. दरम्यान, श्री शिवजन्मोत्सवा निमित्त MKCL तर्फे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा