गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना डिस्चार्ज

मुंबई : भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना तब्बल २८ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
याविषयी त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून माहिती दिली असून रुग्णालयातील कर्मचारी तसेच चाहत्यांचे आभार मानले आहेत.
ट्विटमध्ये म्हणाल्या की, गेल्या २८ दिवसांपासून मी न्यूमोनियाने आजारी होते. पूर्णपणे बरी झाल्याशिवाय मला डिस्चार्ज द्यायला डॉक्टर तयार नव्हते.
परमेश्वर, माई आणि बाबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे मी बरी झाले असून रुग्णालयातून घरी परतले आहे. तुमच्या सर्वांचे मी आभारी आहे.
माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचारी वर्गाचेही मी आभारी आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्यादरम्यान, लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा