नक्षली नेता सृजनाक्का ठार झाल्याच्या निषेधार्थ गडचिरोली बंदची घोषणा

गडचिरोली, दि.२० मे २०२०: गडचिरोली मध्ये नक्षलवाद्यांनी आज (बुधवारी) बंदची घोषणा दिली आहे. पोलिसांशी झालेल्या चकमकीत नक्षली नेता सृजनाक्का ठार झाल्याच्या निषेधार्थ हा बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
गडचिरोलीमधील धानोरा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर छत्तिसगडमधून रेती वाहतूक करणार्‍या ३ ट्रकला पेटवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून आजच्या गडचिरोली बंदची माहिती दिली होती.
दरम्यान १७ मे ला भमरागडमध्ये लदंडी-गुंडूरवाही जवळ असणार्‍या जंगलात सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणला होता.

एका मिडियाकडून मिळाल्या माहितीनुसार, मंगळवारी(दि.१९)रोजी राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या खाजगी कंत्राटदाराची ट्रक थांबवून त्यामधील लोकांना हुसकावून लावण्यात आले.त्यानंतर या वाहनांना आग देखील लावण्यात आली. यामध्ये टायर फुटल्यानंतर मोठा आवाज झाला. धुराचे लोट पहायला मिळाले. यामुळे काही काळ स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळले .

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा