राजगड किल्ला….
“राजगड किल्ला हा इसवी सणाच्या पहिल्या शतकातील किल्ला आहे. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडाची ओळख आहे. पुणे शहरापासून ४८किलोमीटर अंततररावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी खोऱ्यात मुरंबादेवाचा डोंगर उभा आहे.त्या डोंगरावर हा किल्ला आहे.”
मावळ भागामध्ये राज्य विस्तार करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले अगदी मोक्याच्या ठिकाणी होते. परंतु तोरणा किल्ल्याचा बाले किल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला योग्य नव्हता. त्यामानाने राजगड हा दुर्गम भागात असल्यामुळे तसा तो सुरक्षित होता.आणि त्या किल्ल्यावर येताना एखादी टेकडी अथवा नदी ही ओलांडावीच लागते.त्यामुळे सुरक्षा आणि राजकीय आर्थिक राजधानी म्हणून शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निवड केली.
राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडाचा बालेकिल्ला हा समुद्र सपाटी पासून अतिशय उंचावर आहे. त्याची उंची सुमारे १४०० मीटरच्या आसपास आहे. राजगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा कसा विस्तार झाला हे दाखवण्याचे काम करतो.त्यामुळे इतिहासकांच्या बखरीमध्ये या किल्ल्याला विशेष महत्व आहे.
पूर्वी या किल्ला डोंगर होता. परंतु गौतमीपुत्र सातकर्मी याने या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप दिले. शिवाजी महाराजांनी इ.स.१६४४-४५ मध्ये शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला आणि त्यावर बांधकाम केले. या किल्ल्यावर सुमारे २६ वर्ष या किल्ल्यावर गेली. याशिवाय राजाराम राजेंचा जन्मही याच किल्ल्यावर झाला.आणि सईबाईचे निधन झाले होते.
सातवाहन पूर्व म्हणजे इ.स.२००० वर्ष पूर्वीपासून हा किल्ला अस्तित्वात आहे. असे इतिहासामधील नोंदींवरून लक्षात येते. राजगडाचे पूर्वीचे नाव मुरंबदेव असे होते. हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. या किल्ल्यावरुन महाराष्ट्रातील सर्व मराठेशाहीचा कारभार चालत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला विशेष ओळख निर्माण करून दिली आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने हा किल्ला खूप प्रेक्षणीय असा आहे. त्यामुळे या किल्ल्यांवर नेहमी पर्यटकांची वर्दळ असते.
-प्रशांत श्रीमंदिलकर