गोल पोस्ट राष्ट्रीय गगनभरारीची प्रेरणा देणारी अंतराळपरी कल्पना चावला

गगनभरारीची प्रेरणा देणारी अंतराळपरी कल्पना चावला

अवकाशात प्रवेश करण्याचे स्वप्न प्रत्येकालाच असते. परंतु ते सर्वानाच पूर्ण करता येते असे नाही. अशीच एक व्यक्ती जिने अवकाशात प्रवेश करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते पूर्णही पाकिस्तानकडून टपाल सेवा पुन्हा सुरू ती व्यक्ती म्हणजे कल्पना चावला.याच दिवशी यांनी अंतराळात झेप घेतली होती.

कल्पना चावला यांचा जन्म हरियानामध्ये १७मार्च १९६२रोजी झाला. त्यांचे वडील बनारसी लाल चावला आई संयोगीता चावला. कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. कॉलोरॅडो विद्यापीठातून १९८८ मध्ये डॉक्टरेट मिळवली. १९९४ साली अमेरिकेतील नासामध्ये निवड झाली.

चावला यांच्या आयुष्यातील काही खास गोष्‍टी:

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA इथे त्यांनी १९८८ पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.

नासाने १९९४ साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला.

एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळ यानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचे त्यांनी काम केले.

नोव्हेंबर १९९६ मध्ये ATS-८७ मिशनच्या संशोधनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.

१९ नोव्हेंबर १९९७ या दिवशी कल्पना चावला यांनी अंतराळात झेप घेतली.

त्यानंतर त्यांनी तब्बल ३७६ तास आणि ३४ मिनिटे अंतराळात घालवली. त्यांनी पृथ्वीला २५२ फेऱ्या मारत १ कोटी ४६ हजार किमीहून अधिक प्रवास केला.

जानेवारी २००३ च्या १६ दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक झाली होती.

१ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडे झेप घेऊन सकाळच्या ८.४० वा. यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.

२२ मिनिटामध्ये हे यान पृथ्वीवर उतरणार इतक्यात यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला. आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झाले. त्यातच अंतराळवीरांचे निधन झाले.

error: Content is protected !!
Exit mobile version