नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२१: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गगनयान मोहिमेत पुढे जात २८ ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या सर्विस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टम (SMPS) पहिली हॉट टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली. याला सिस्टीम डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल (SDM) नाव देण्यात आले आहे. गगनयानची सर्विस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टम (SMPS) ४५० सेकंद चालवण्यात आली. ही प्रणाली गगनयान कॅप्सूलमध्ये बसवली जाईल, जेणेकरून भारतीय अंतराळवीर पृथ्वीच्या वर जातील.
इस्रोने सांगितले की, ही चाचणी तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथे असलेल्या इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स (IPRC) येथे करण्यात आली. अजून अनेक हॉट टेस्ट करायच्या आहेत. या परीक्षेसाठी ठरवलेल्या मानकांमध्ये या प्रणालीने स्वतःला सिद्ध केले आहे. हे मॉड्यूल गगनयानच्या क्रू मॉड्यूलच्या खाली स्थापित केले जाईल. पृथ्वीवर परतताना ते उपयोगी पडेल.
या मॉड्यूलमध्ये युनिफाइड बायप्रोपेलेंट सिस्टम बसवले आहे. यात पाच इंजिन आहेत जे ४४० न्यूटनची शक्ती निर्माण करतात. याशिवाय, १६ रिएक्शन कंट्रोल सिस्टम (RCS) आहे, जी १०० न्यूटनची शक्ती निर्माण करते. हे लहान थ्रस्टर्स आहेत जे MON-3 आणि MMH यांना ऑक्सिडायझर आणि इंधन म्हणून वापरतील. यापूर्वी १४ जुलै रोजी इस्रोने गगनयान मोहिमेच्या विकास इंजिनच्या लॉन्ग हॉट टेस्टची तिसरी यशस्वी चाचणी घेतली. हे इंजिन GSLV-MkIII रॉकेटच्या लिक्विड स्टेजमध्ये बसवले जाईल. ही चाचणी इंजिनची कार्यक्षमता तपासण्यासाठी केली गेली, जी त्याने यशस्वीपणे केली.
महेंद्रगिरी येथील इस्रोच्या प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये (IPRC) २४० सेकंदांसाठी विकास इंजिन चालवले गेले. या चाचणीमध्ये, इंजिनने स्वतःला ठरवलेल्या मानकांशी खरे असल्याचे सिद्ध केले. त्याने सर्व संभाव्य गणना पूर्ण केली आणि चांगली कामगिरी केली. हे इंजिन रॉकेटच्या वेगवेगळ्या टप्प्यात स्थापित केले जाईल, जे गगनयान कॅप्सूल अंतराळात घेऊन जाईल.
या वर्षी मार्च महिन्यात भारतीय हवाई दलाच्या चार अधिकाऱ्यांनी गगनयानसाठी रशियात प्रशिक्षण पूर्ण केले. राजधानी मॉस्कोजवळील ग्योजेनी शहरात असलेल्या रशियन अंतराळ प्रशिक्षण केंद्रात त्यांना अंतराळवीर बनण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यांना गगनॉट्स म्हटले जात आहे.
भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना गागारिन कॉस्मोनॉट्स ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यावेळी रशियन स्पेस एजन्सीचे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी याची पुष्टी केली. ते म्हणाले होते की रशियाला भारतासोबत भविष्यातील मोहिमा करायच्या आहेत. भारतीय हवाई दलाचे अधिकारी गगनॉट्स बनवण्यासाठी इस्रो आणि रशियाच्या ग्लॅव्हकोसमॉस यांच्यात जून २०१९ मध्ये करार करण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे