गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे गलांडवाडी बनणार १००% सौरऊर्जा गाव! ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव मंजूर

गलांडवाडी बनणार १००% सौरऊर्जा गाव! ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव मंजूर

दौंड तालुक्यातील गलांडवाडी गावाने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ग्रामसभेत गावातील सर्व घरे आणि शेतीपंप १०० टक्के सौरऊर्जेवर चालवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गावाचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊन २४ तास वीज उपलब्ध होणार आहे, जे शेतीसाठी एक वरदान ठरेल.

या निर्णयामुळे गावाला आर्थिक स्थैर्य मिळेल तसेच पर्यावरणाचे संरक्षण होईल. केवळ सौरऊर्जाच नाही, तर गावात बायोगॅस युनिट्स उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. बायोगॅसमुळे स्वस्त आणि स्वच्छ इंधन मिळेल, तर स्लरीचा वापर खत म्हणून करून जमिनीची सुपीकता वाढवता येणार आहे. हा निर्णय इतर गावांनाही प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version