पुणे, दि. २२ जुलै २०२०: लाॅकडाऊनच्या काळात प्रत्येकाला मानसिक तणाव हा येत आहे. तर गेली ५ महीने ही लहान मुले आणि तरुणाई यांच्यासाठी सोशल मिडियाचे माध्यम हे फार सोयीस्कर होताना दिसत आहे. हल्लीच्या तरुणाईला सोशल मिडियाचे प्रचंड वेड लागल्याचे पहायला मिळते. म्हणजे या लाॅकाडाऊन काळात २४ तासापैकी १२ ते १३ तास हा त्या मानवनिर्मित मोबाईल यंत्राच्या प्रचंड आहारी गेले आहेत. पण ते अनेकांच्या जीवावर देखील बेतल्याचे आपण पाहिले असून अशीच एक घटना हि पब्जी गेममुळे घडल्याची समोर आली आहे.
भारतातील जवळपास ५०% पेक्षा जास्त तरुणाईला या पब्जीने अक्षरश; वेड लावले आहे. अनेक तरुण हे मानसिक रोगी झाले तर काहींनी हा खेळ का खेळू दिला नाही म्हणून अनेक गुन्हे केले. आधी १७ ते १८ वयोगटापासून प्रत्येक वयोगटात याचे वेड आहे तर आता हल्ली ७ ते १४ वर्षाची मुलें देखील या पब्जी गेमच्या विळख्यात आडकल्याचे पहायला मिळते.


असाच एक राजवीर ठाकूर ७ वी कक्षेत शिकणारा हा विद्यार्थी पब्जी गेमचा शिकार झाला आहे. १३ वर्षाच्या या निरागस बालकाला गेम खेळत असताना कठीण टास्क पार करता येईना म्हणून त्यांने नैराश्यातून राहत्या घरी गळफास लावून आपले आयुष्य संपवले. त्याच्या आत्महत्येने त्यांच्या घरच्यांवर दुखाची शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहिती नुसार राजवीर हा पब्जी गेम जास्तीत जास्त खेळत होता आणि त्याला या गेम मधे कठिण टास्क मिळाला जो त्याला पार करता आला नाही आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. राजवीरचे वडिल हे कोविड योद्धा आहेत ते नागपूर पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असून या घटनेने ते संपूर्णपणे खचले आहेत.


भारतातील तरुणाई भरकटली आहे का?
भारतातील राजवीरची या खेळामुळे मृत्यूची पहिली घटना नाही तर या आधी देखील अनेक घरच्यांना पब्जी गेममुळे आपले राजवीर गमवावे लागले आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे जो बेरोजगार देखील आहे. तेव्हा हा तरुण स्वत:ला रमवण्यासाठी सोशल मिडियाच्या विविध माध्यमातून काही तरी नवीन करु पाहत असतो. काही दिवसांपुर्वीच भारतात टिकटाॅक या अॅपवर बंदी घातल्यामुळे तरुणाई हि मोठ्या प्रमाणात नाराज झाली होती. प्रशासनाने पर्यायी अॅप दिले तेव्हा कुठे हा क्रोध क्षमला. ज्या कंपनीने हे टिकटाॅक अॅप बनवले होते त्या कंपनीने हे फक्त रिकामटेकड्या मुर्ख लोकांच्या मनोरंजनासाठी हे अॅप बनविल्याचा खुलासा केला आणि आर्श्चय म्हणजे भारत हा टिकटाॅक वापरण्यारांच्या यादीत पहिला होता. हि फार चितेंची बाब आहे.


भारतीय प्रशासनाने अॅपवर बंदी आणून डिजीटल क्रांती केली खरी पण या तरुणाईला रोजगार दिला आसता अथवा गांभीर्यांने यांचा वापर करुन घेतला असता तर आज १३ वर्षाचा राजवीर आपल्यात असता. कारण आज १३ वर्षाच्या मुलाला आयुष्याचा अर्थ कळत नाही आणि तो मानव निर्मित या यांत्रिक जगात कधी फसला हे त्यालाही कळले नाही. अर्थात प्रशासनाबरोबरच आई वडिलांची देखील तितकीच नैतिक जवाबदारी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी