सोलापूर, ३१ जुलै २०२१: ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम केलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं सोलापूरमध्ये प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.
गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर हजारो कार्यकर्ते जोडले. त्यांच्या राजकारणातल्या यशस्वी कारकीर्दीचं तेच गूढ होतं.
अत्यंत साध्या राहणीमानामुळं सर्वसामान्य माणसांना ते नेहमीच आपले वाटत.
एकच झेंडा एकच पक्ष आणि एक मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल ११ वेळा निवडून येऊन तब्बल ५० वर्षे विधिमंडळात आपल्या अभ्यासू राजकारणाने प्रभाव पडणारे अखिल भारतीय कामगार पक्षाचे हरहुन्नरी नेते म्हणून त्यांची ओळख होती.
गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून त्यांनी तब्बल अकरावेळा विक्रमी विजय मिळवला. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.
गणपतराव देशमुख यांचा पार्थिवदेह सोलापूरहून त्यांच्या मोहोळ तालुक्यातील पेनूर या मूळ गावी आणले आहे.
यावेळी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह अनेकांना अश्रू अनावर झाले. सांगोला सूतगिरणी परिसरात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी; किरण कानडे.