महात्मा गांधींच्या मार्गदर्शनातून समाजात सद्भाव निर्माण होईल – मोहन जोशी

सध्या देशात जातीयवाद पसरवला जात असताना महात्मा गांधीजींच्या विचारातूनच सद्भाव निर्माण होईल आणि सलोखा नांदेल, असे प्रतिपादन माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी गुरुवारी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने पुणे रेल्वे स्थानक येथे महात्माजींच्या पुतळ्याला मोहन जोशी यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबा आढाव यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.

मोहन जोशी म्हणाले की, मतांच्या राजकारणासाठी काही शक्ती जातीयवादाचे वातावरण तयार करत आहेत. अशावेळी महात्माजींच्या विचारांचे महत्त्व अधिक स्पष्ट होते आणि या विचारांचे अंगीकार करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमात उपस्थित होते: सुनिल मलके, चेतन आगरवाल, खंडू सतीश लोंढे, शाबीर खान, सुरेश कांबळे, आयुब पठाण, ॲड. निलेश बोराटे, डॉ. सुनील जगताप, ॲड. मोहन वाडेकर, प्रशांत वेलणकर, विकास सुपनार, समिर गांधी, विशाल मलके, महेंद्र चव्हाण, अनिल आहेर, कन्नैया मिनेकर, सुरेश राठोड, विनय माळी, सचिन भोसले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहन जोशी