पुरंदर, २१ फेब्रुवारी २०२४ : सासवड ( ता.पुरंदर ) येथे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. या मेळाव्यात सर्वच वयोगटातील कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या मेळाव्याला मध्ये लक्षणीय ठरली ती गांधी टोपी. जुने जाणते गांधी टोपी परिधान करणारे राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आवर्जून आपल्या साहेबाच्या मुलीच्या मदतीसाठी उपस्थित राहिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांना मानणारे अनेक कार्यकर्ते अजित पवार यांच्या पक्षात दाखल झाले. लोकसभा मतदार संघात अजित पवार यांनी आपल्या पत्नीला लोकसभेसाठी उभे करणार असल्याचे संकेत देत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. अशावेळी सर्वच तरुणाई अजित पवार यांच्या बाजूला जाईल असे वाटत असताना पुरंदर मधील अनेक तरुण सुळे यांच्या बरोबर असल्याचे आज सासवड येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आले. मात्र त्यापेक्षा लक्षणीय ठरली ती ज्येष्ठ कार्यकर्त्यांची संख्या. अनेक वर्ष ही ज्येष्ठ मंडळी राजकारण पासून दूर गेली होती. अजित पवार यांच्या एककल्लीपणाला किंवा वयाचा आदर न करता बोलण्याच्या पद्धतीमुळे शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते राजकारणापासून दूर गेले होते. त्यामुळे पुरंदरच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गांधी टोपी विरळ झाली होती. मात्र आज सासवड येथील मेळाव्यात गांधी टोपीची संख्या लक्षणीय होती. अडचणीच्या काळात आम्ही साहेबाच्या बरोबरच असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे