गोल पोस्ट राष्ट्रीय गांधीनगर-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुन्हा गुरांवर आदळली मागील दोन महिन्यातील ही चौथी...

गांधीनगर-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुन्हा गुरांवर आदळली मागील दोन महिन्यातील ही चौथी घटना

मुंबई, २ डिसेंबर २०२२ :वंदे भारत एक्स्प्रेस’ची गुरांना धडक देण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुजरात-मुंबई दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ गाडी पुन्हा एकदा गुरांवर आदळली आहे. मागील दोन महिन्यातील ही चौथी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी गांधीनगर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या ट्रॅकवर ही गुरं आली असता पुन्हा एकदा गुजरात-मुंबई दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या गुरांवर आदळली. या घटनेत रेल्वेच्या पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

  • १२ मिनिटांनी पुन्हा सुरु झाला पुढचा प्रवास

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, ‘उदवाडा आणि वापी दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ८७ जवळ संध्याकाळी ६ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. यात रेल्वेच्या पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. या घटनेमुळं काही वेळ रेल्वे थांबल्यानंतर सायंकाळी ६.३५ वाजता म्हणजेच १२ मिनिटांनी गाडी पुढच्या प्रवासाला निघाली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version