Ganesh festival preparations by autistic children: श्रावण महिन्यातील उन पावसाचा आनंद घेत असतानाच सर्वांना वेध लागतात ते श्री गणरायाच्या आगमन होण्याचे. श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सजावटीची तयारी करत असताना पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची देखील तयारी सर्वजण करतात. या वस्तूंची गरज लक्षात घेऊन प्रसन्न ऑटीझम सेंटर च्यl स्वमग्न ( ऑटिस्टिक) विद्यार्थ्यांनी पूजेसाठी आवश्यक १८ कोरड्या वस्तूंचा बटवा तयार करायला सुरुवात केली आहे. या बटव्यात हळद ,कुंकू ,जानवी जोड ,रांगोळी, धुपकांडी, अष्टगंध, अक्षता इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. प्रसन्न ऑटीझम सेंटर मध्ये या मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातात त्या अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात. प्रसन्न ऑटीझम सेंटरच्या प्रमुख साधना गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या उपक्रमाला अनेक व्यक्ती व संस्था सहकार्य करून या मुलांना पाठबळ देत आहेत.
न्यूज अनकट प्रतीनिधी, वैभव वाईकर













































