कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मुर्ती, पूजा साहित्य मिळणार घरपोच

वाघोली, दि. १० ऑगस्ट २०२०: कोरोना सावटाच्या परिस्थितीत गणेश उत्सव आला असल्याने वाघोली परिसरातील नागरिकांना गणेश मूर्ती व पूजा साहित्य घरपोच मिळावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खटके व श्री गणेश आर्ट यांच्या संकल्पनेतून बाप्पा आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे.

लवकरच आपल्या लाडक्‍या बाप्पाचे आगमन होणार असून कोरोनाच्या संकटात देखील सर्व जग बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहे. अशातच गणेश मूर्ती व पूजा साहित्याची खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खटके व श्री गणेश आर्ट यांनी बप्पा आपल्या दारी संकल्पना वाघोलीत राबवली आहे.

यामध्ये इको फ्रेंडली व पीओपीच्या श्री गणेश मूर्ती व बाप्पाच्या पूजेचे साहित्य टेम्पो ट्रॅव्हलर व्हॅन मधून घरापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यामधील मूर्ती पाहून गणेशभक्तांनी मूर्ती बुकिंग करून ठेवायचे असून त्यानंतर गणेश उत्सवाच्या दोन दिवस आधी मूर्ती घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा