गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

हडपसर: विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तके न वाचता माणसाने वाचायला शिकले पाहिजे. संस्कारात शिक्षण व्यर्थ आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. असे प्रतिपादन लिज्जत पापड चे मॅनेजिंग डायरेक्टर एक्झिक्यूटिव्ह प्रेसिडेंट सुरेश कोते यांनी केले.

महात्मा फुले विद्या निकेतन संस्था आणि बचपन फोरम बचपन वर्ड फोरम यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सदर स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नाट्य, गायन, नृत्य आदी कलांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. घरटे प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य प्रशंसनीय ठरले. महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या इंग्रजी माध्यमांच्या विविध शाखातील अंदाजे एक हजार विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

याप्रसंगी राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार देऊन समाजातील उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. यामध्ये नवचैतन्य हास्य योग परिवाराचे सचिव पोपटलाल सिंघवी, सुशीला बेन मोतीलाल शहा चारिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी मोतीलाल शहा, ज्येष्ठ कवी नाना भाऊ माळी, युएस येथील संगणक तज्ञ समृद्धी नाईक, यांचा समावेश होता.

यावेळी महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी सर यांच्या वाढदिवसानिमित्त सुशीला बेन मोतीलाल शाह चारिटेबल ट्रस्टने अपंगांना चार व्हीलचेअर प्रदान केल्या.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. पी. द्रेडर्सचे चेअरमन दशरथ जाधव, तेरापंथी जैन, समितीच्या अध्यक्ष पुष्पाताई कटारिया, सेवा मित्र मंडळाच्या संस्थापक शिरीष भाऊ मोहिते सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे, महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी सर, महात्मा फुले विद्याविद्यानिकेतन संस्था अध्यक्षा स्मिताताई वाघ, महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे सचिव प्राचार्य रविंद्र वाघ, सर्व संस्थेच्या शाखांचे प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी व कल्पना त्रिपाठी यांनी केले, तर आभार प्रदर्शन महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेचे अध्यक्षा स्मिताताई वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्याआयोजनामध्ये बचपन वर्ल्ड फोरमचे संस्थापक रतन माळी, महात्मा फुले विद्या निकेतन संस्था अध्यक्षा स्मिताताई वाघ व सचिव प्राचार्य रविंद्र वाघ तसेच सर्व शाखांच्या मुख्याध्यापकांचा विशेष सहभाग होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा