अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुरंदर तालुकाध्यक्षपदी गणेश मुळीक तर उपाध्यक्षपदी सुभाष जेधे.

पुरंदर : ८ ऑक्टोबर २०२०: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी सासवड येथील गणेश मुळीक तर उपाध्यक्षपदी नीरा येथील सुभाष जेधे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबाचे पत्र आखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गायकवाड यांनी नीरा येथे दिले आहे.
गुलाबराव गायकवाड यांनी नुकतीच नीरा येथील मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या ठीया आंदोलनाला भेट दिली.अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील नीरा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेली २१ दिवस ठिय्या आंदोलन सुरु आहे. निरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ग्रामपंचातीच्या कार्यालय परिसरात मागील महिन्याच्या १८ तारखेपासून दररोज संध्याकाळी ६:३० ते ७:३० या वेळेत ठिय्या आंदोलन सुरु आहे.

कोरोना संसर्गाच्या कारणाने आंदोलनस्थळी मोजक्याच लोकांच्या उपस्थित कोरोना बाबतचे नियम पाळत शांतते आंदोलन सुरू आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष गुलाबराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, गणेश मुळीक, संजय पापळ, जिल्हा संघटक अमोल गायकवाड, पुरंदरचे संघटक बाबुराव गायकवाड, यांनी भेट दिली यावेळी सुभाष जेधे, प्रकाश माने, सुभाष पवार, सुरेश सपकाळ, प्रमोद डांगे, वैभव धुमाळ, राजू पवार, राजूशेठ महामुनी, शशिकांत जेधे, भरत निगडे आदी उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी गणेश मुळीक व सुभाष जेधे यांना निवडीचे पत्र दिले व मराठा समाजाच्या विकासासाठी काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाबुराव गायकवाड यांनी केले. स्वागत सुभाष जेधे यांनी केले तर आभार प्रमोद डांगे यांनी मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी :- राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा