अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर चोरी करणाऱ्यांची टोळी भंडाऱ्यात गजाआड

15
Gang of thieves raids warehouse on auspicious occasion of Akshaya Tritiya
अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर चोरी करणाऱ्यांची टोळी भंडाऱ्यात गजाआड

Bandara : काल संपूर्ण देशभरात अक्षय तृतीयाचा सण गुण्या आनंदाने साजरा करण्यात आला. कालच्या दिवशी बाजारपेठा सोन्याने गजबजलेल्या होत्या. यामुळे बऱ्याच लोकांनी अक्षय तृतीयच्या शुभ मुहूर्तावर सोन खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. एकीकडे सोन खरेदी करण्याचा शुभ असा मुहूर्त असतानाच दुसरीकडे भंडाऱ्यात पोलिसानी सोन्याची चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेली ही टोळी एकाच घरातील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही बातमी कळताच पोलिसांना सुद्धा धक्का बसला आहे. या टोळीमध्ये दोन महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे.

हे सर्व दरोडेखोर छत्तीसगडच्या बिलासपूर येथील तीन दुकांदारांची फसवणूक करून रोख रखमेसह सोन्या चांदीचे दागिने घेऊन पळाले होते. त्यांना पोलिसानी भंडाऱ्यात नकाबंदी करून अटक केली. भंडाऱ्या जिल्ह्यातील कारधा पोलिसांनी ही कारवाई केली असून भिलेवाडा येथील एका पेट्रोल पंपावर कारमधुन आलेल्या या टोळीला ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतल. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशमधील इलाहाबाद येथील असून त्यांच्याकडून तब्बल ३१२ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,३ हजार ४०० ग्राम चांदीचे दागिने आणि ९४ हजार ८२८ रूपये रोख रकमेसह जप्त करणायात आले आहेत. दरम्यान याप्रकरणी कारधा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून उद्या आरोपीना न्यायलयात हजर केले जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर