प्रयागराज, १६ एप्रिल २०२३ : माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी रात्री प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या बंदोबस्तात वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना माध्यम प्रतिनिधींसमोरच ही हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावून तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
अतिक आणि अशरफ यांच्यासोबत उपस्थित असलेले धूमगंज येथील कॉन्स्टेबल मानसिंग हेही गोळीबारात जखमी झाले. लवलेश तिवारी, अरुण आणि सनी अशी हत्या करणाऱ्या तरुणांची नावे आहेत.
हत्येप्रकरणी माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ हे चार दिवस पोलिस कोठडीत होते. शनिवारी तिसऱ्या दिवशी धुमणगंज पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंद असलेल्या अतिक आणि अश्रफ यांची एटीएसकडून शस्त्र तस्करीसंदर्भात चौकशी करण्यात आली. रात्री १०:३० च्या सुमारास दोघांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी कोल्विन रुग्णालयात नेले जात होते. त्यावेळे दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर मीडियाचे लोक म्हणून आले आणि त्यांनी वेगाने गोळीबार सुरू केला ज्यात दोघांचा मृत्यू झालं.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड