महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे परत मिळणार

मुंबई, १६ एप्रिल २०२३: शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखे परत मिळणार आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मैल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने शनिवारी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यासंदर्भात मुंबईत त्यांच्याशी झालेल्या चर्चेत अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवराज्याभिषेकांच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य सरकार राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे.

या अनुषंगाने महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून मिळवविण्याचा संकल्प मुनगंटीवार यांनी केला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या चर्चेच्या वेळी ब्रिटिश उपउच्चायुक्तलयातील राजकीय विभागविषयक उप प्रमुख इमोजेन स्टोन या देखील उपस्थित होत्या. मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनमध्ये संबंधित अधिकाऱ्यांसोबत सुधीर मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा