जेजुरीतील कडेपठार गडावरील गणपुजा उत्सव रद्द

पुरंदर, दि. १८ जून २०२० : दरवर्षी होणारा जेजुरी येथील कडेपठार गडावरील गणपुजा उत्सव कोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे आज विश्वस्त नागरिक मानकरी व पोलीस प्रशासन यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हा उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आख्यायीके नुसार मणी मल्ल या असुरांचा नाश करण्यासाठी शिवशंकराने खंडोबाचा अवतार धारण केला. यावेळी आषाढ शुद्ध प्रतिपदेला देवगणांनी खंडोबाची भंडारा उधळून पूजा केली तीच परंपरा पुढे राखत आषाढ शुद्ध प्रतिपदेला खंडोबाची गणपुजा केली जाते. गणपुजा उत्सव म्हणून हा उत्सव प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या समाजातील लोकांना याठिकाणी पुजेचा मान आहे, यामध्ये वाणी, रामोशी, गुरव, कोळी, विर घडसी, वाघ्या मुरळी यांचे गणपुजेत मानतात असतात.

या पूजेला राज्यातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने जेजुरी येथील कडेपठार मंदिरात येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासन व मानकरी यांची बैठक घेऊन हा उत्सव या वर्षासाठी रद्द करण्यात आला आहे. या बैठकीला कडेपठार देवस्थानचे विश्वस्त चिंतामणी सातभाई, रामचंद्र दीडभाई, नितीन कदम, सचिव सदानंद बारभाई, खांदेकरी मानकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश आगलावे, महेश आगलावे रामोशी समाजाचे अध्यक्ष अशोक खोमणे, वाणी समाजाचे राजू सोनवणे, संतोष खोमणे, भारत शेरे, नगरसेवक बाळासाहेब सातभाई, सतीश कदम, सचिन सातभाई, ज्ञानेश्वर मोरे, आबा राऊत, सुरेंद्र नवले, राजेंद्र मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा