पुण्यातील कचरा व्यवस्थापनाची परदेशी पाहुण्यांना भुरळ

पुणे, ४ मे २०२३: महापालिकेच्या देवांची उरुळी आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमधील बायोमायनिंग, कचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा कॅपिंग आणि वृक्षारोपण करण्यात आलेल्या प्रकल्पांना बुधवारी विविध १८ देशाच्या प्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली आहे. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी भारतभेटीवर आलेल्या १८ देशाच्या प्रतिनिधींनी पुणे महापालिकेच्या प्रकल्पांची निवड केली आहे.

१८ देशाच्या प्रतिनिधींमध्ये १४ प्रतिनिधी हे आफ्रिकेतील विविध १४ देशांचे होते. तर आशियामधील बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूतानच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश होता. दोन दिवसांच्या पुणे भेटीवर आलेल्या या प्रतिनिधींनी घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करणे, त्यांची प्रक्रिया प्रकल्पांपर्यत वाहतूक तसेच प्रत्यक्ष प्रक्रिया प्रकल्प आणि जुन्या साठलेल्या कचऱ्यावरील बायोमायनिंग प्रकियाची पाहणी केली.

या प्रकल्पांतून होणारी सेंद्रिय खतनिर्मितीची माहिती घेतली. कचरा गोळा करण्यापासून त्यावरील प्रक्रियेसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे या प्रतिनिधींनी कौतुक केल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा