गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा मुंबई-आग्रा महामार्गावर गॅस कंटनेरचा स्फोट

मुंबई-आग्रा महामार्गावर गॅस कंटनेरचा स्फोट

धुळे, दि.१९ मे २०२०: मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या अजंग गावाजवळ गॅस कंटेनर आणि खाजगी बसची सामोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भयानक होती की गॅसकंटेनरने लगेच पेट घेतला. त्यामुळे
काही क्षणात या स्फोटक आगीने रौद्ररूप धारण केले की त्यामुळे कंटेनरचा स्फोट झाला.

या स्फोटात खाजगी बस आणि कंटेनर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत ३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तर बसमध्ये असलेल्या प्रवाशांच्या संख्येबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version