गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा आंबेगाव तालुक्यात आढळला पहिला कोरोना पॉजिटीव रूग्ण

आंबेगाव तालुक्यात आढळला पहिला कोरोना पॉजिटीव रूग्ण

मंचर, दि. १९ मे २०२०: आंबेगाव तालुक्यात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला असून तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण साकोरे गावात आढळला आहे. या गावातील ३८ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉजिटिव आढळल्याने हा परिसर कंन्टेंमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.

कोरोना पॉजिटिव व्यक्ती ही १५ तारखेला मुंबईतील विक्रोळी परिसरातून साकोरे या आपल्या गावी आली होती,१६ तारखेला या व्यक्तीला त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले होते.अखेर आज सकाळी या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आल्याने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाकडून तालुक्यातील जनतेला खबरदारी घेण्याचे आव्हान करण्यात आले असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे

error: Content is protected !!
Exit mobile version