मुंबईत फार्मा कंपनीत गॅस गळती, अधिकारी घटनास्थळी दाखल, तपास सुरू

मुंबई, दि. ७ जून २०२०: कोरोना आणि चक्रीवादळ निसर्ग नंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता गॅस गळती उघडकीस आली आहे. मुंबईतील फार्मा कंपनीतील गॅस गळतीमुळे खळबळ उडाली आहे . गॅस गळतीच्या तक्रारीनंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बीएमसीच्या म्हणण्यानुसार गॅस गळतीचा तपास सुरू आहे.

मुंबईतील अनेक भागांतून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने तातडीने सतर्कता दाखवत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आणि इतर संबंधित एजन्सींना तपासासाठी पाठविले गोले. तपासादरम्यान फार्मा कंपनीकडून गॅस गळती झाल्याचा प्रकार समोर येत आहे. घटनास्थळी पोहोचलेले अधिकारी तपासात गुंतले आहेत.

हा गंध नेमका कोठून येत आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे बीएमसीने ट्विट मध्ये म्हटले आहे. यापूर्वी बीएमसीने ट्वीट करून माहिती दिली होती की चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई येथील रहिवाशांकडून गॅस गळती झाल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. अग्निशमन दलाला संबंधित भागात पाठविण्यात आले आहे. महानगरपालिकेने सांगितले की गंभीरता पूर्वक तक्रारी घेत सर्व संबंधित एजन्सींना सतर्क केले गेले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट केले आहे की परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व शक्य आणि आवश्यक संसाधने वापरली जात आहेत. घाबरू नका, असे आवाहन करत लोकांना खिडक्या आणि दरवाजे लॉक करण्याचा सल्ला दिला गेला आहे.

तसेच बीएमसीने लोकांना घाबरू नका असे आवाहन केले आहे. संबंधित १३ ठिकाणी अग्निशमन दलाला पाठविण्यात आले आहे. या दुर्गंधीमुळे कोणाला त्रास होत असेल तर नाक झाकण्यासाठी ओले टॉवेल्स किंवा कापड वापरा असेही सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा