गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना हटवले

23

मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे जेएनयू हिंसाप्रकरणी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. मात्र आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सर्व आंदोलकांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात असून पर्यटकांना त्रास होत असल्याचं सांगत आझाद मैदानात आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच आंदोलनाला परवानगी नसल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

याबाबत पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, उच्च न्यायालयाच्या गाईड लाइननुसार गेट वे ऑफ इंडियावर प्रदर्शन करता येऊ शकत नाही. तसेच सोमवारी काढण्यात आलेल्या हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया रॅलीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडला होता. मात्र विद्यार्थ्यी गेटवे सोडण्यास तयार नव्हते.

पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, त्यांच्या आंदोलनाला कोणताही आक्षेप नाही. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. देशविरोधी फ्री काश्मीरचे फलक झळकावले तरीही त्याविरुद्ध कारवाई केली जाणार नाही. मात्र हे आंदोलन गेट वे ऑफ इंडियापासून हटून आझाद मैदानात आंदोलन करावे. आता विद्यार्थ्यांना येथून हटवण्यात आले आहे. गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं नाही. आझाद मैदानात रवानगी केली आहे. असे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा