भोकरदन, १३ मार्च २०२४ : भोकरदन येथे रत्नमाला लाॅन्समध्ये ११ मार्च रोजी भोकरदन मित्रमंडळ तर्फे गौरी गणेश उत्सव २०२३ साठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संतोष पा.दानवे, प्रमुख पाहुणे म्हणून मोहन देशमुख, तहसीलदार संतोष बनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, विरेंद्र देशमुख, संजय लहाने, शब्बीर कुरेशी, शफीकसेट पठाण, महादुशेठ डोभाळ, अनिल देशपांडे, संतोष अन्नदाते, कदीर बापू, अझहरभाई शहा, नाजेम शहा, शमीम मिर्झा हे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भोकरदन मित्र मंडळाचे मार्गदर्शक माजी. नगराध्यक्ष ॲड. हर्षकुमार जाधव यांनी केले. त्यामध्ये त्यांनी मित्र मंडळाने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच सामाजिक एकोप्यासाठी गौरी गणेश स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले. तसेच आमदार संतोष दानवे यांनी मित्र मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची समाजाला गरज असल्याचे मत व्यक्त केले. समाजासाठी असे उपक्रम आपण पुढे चालू ठेऊन सामाजिक एकोपा जोपासावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकारांच्या नुतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला.तसेच गणेश उत्सवात चांगल्या व्यवस्थेबद्दल पोलीस प्रशासन, नगर परिषद आणि विद्युत मंडळाच्या प्रमुखांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गौरी, गणेश स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ५००० रु. आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय बक्षीस ३००० रु. आणि स्मृतिचिन्ह, तृतीय बक्षीस २००० रु. आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.नारायण जिवरग यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मित्र मंडळाचे विलास शिंदे, राजेंद्र देशमुख, संजय शास्त्री, राजु इंगळे, योगेश शर्मा, ॲड. सुहास देशमुख, विकास जाधव, मनोज शिंदे, भुषण जाधव, फैसलभाई, ऋषीकेश इंगळे, मंथन शिंदे सिद्धार्थ जाधव यांनी प्रयत्न केले.
विविध स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे :
१. गौरी/महालक्ष्मी देखावा
प्रथम सुजीता भानुदास सोळुंके, द्वितीय छबाबाई रामभाऊ वाघमारे, तृतीय निकीता नरेंद्र देशपांडे, प्रोत्साहन पर सिमा अनिल जाधव, अमृता सचीन शास्त्री, शालिनी सुनील इंगळे, वैशाली ज्ञानेश्वर सुरडकर.
२. गणेश स्थापना
प्रथम तुळजाभवानी नवतरुण गणेश मंडळ, द्वितीय बाळ गणेश मंडळ, तृतीय राजमुद्रा युवा प्रतिष्ठान उत्तेजनार्थ जय भोले गणेश मंडळ, साईराम गणेश मंडळ.
३. सामाजिक/सांस्कृतिक कार्यक्रम
प्रथम समर्थ गणेश मंडळ, द्वितीय जिजामाता गणेश मंडळ, तृतीय रुद्रप्रिय गणेश मंडळ, प्रोत्साहनपर शिवमुद्रा गणेश मंडळ.
४. देखावा/डेकोरेशन
प्रथम नवतरुण गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ द्वितीय समर्थ गणेश मंडळ तृतीय न्यु बजरंग गणेश मंडळ.
५. ढोल ताशा/वाद्य वृंद
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ, नवतरुण गणेश मंडळ, सिध्दीविनायक गणेश मंडळ द्वितीय रुद्रप्रिय गणेश मंडळ तृतीय न्यु बजरंग गणेश मंडळ उत्तेजनार्थ बाळ गणेश मंडळ यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे