नवी दिल्ली, 3 एप्रिल 2022: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती $100 अब्ज झाली आहे. यासोबतच ते जगातील 10वा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
मालमत्तेत जोरदार वाढ
निव्वळ संपत्तीत $2.44 अब्जच्या वाढीसह, अदानी ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 10 व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्याच वेळी, अदानी $ 100 बिलियनच्या निव्वळ संपत्तीसह सेंटबिलियनेअर्स क्लबमध्ये सामील झाले आहेत. 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंटबिलियनेअर्स (Centibillionaires Club)म्हणतात. या वर्षात आत्तापर्यंत अदानीच्या एकूण संपत्तीत $23.5 अब्जने वाढ झाली आहे. या यादीतील सर्व लोकांपैकी अदानीच्या मालमत्तेत यावर्षी सर्वाधिक वाढ झाली आहे.
अंबानी 11व्या स्थानावर आहेत
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आता ब्लूमबर्गच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11व्या स्थानावर आहेत. ते आशिया आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती $99 अब्ज एवढी आहे. या वर्षात आतापर्यंत अंबानींची संपत्ती $9.03 अब्जने वाढली आहे.
टेस्लाचे एलोन मस्क हे सर्वात श्रीमंत व्यक्ती
ब्लूमबर्गच्या यादीनुसार, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती $273 अब्ज इतकी आहे. यानंतर अॅमेझॉनचे जेफ बेझोस येतात. त्यांची एकूण संपत्ती $188 अब्ज आहे.
10 सर्वात श्रीमंत लोकांमध्ये यांचाही समावेश आहे
या यादीत LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट 148 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स 133 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे $127 अब्ज संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. याशिवाय टॉप 10 श्रीमंतांमध्ये लॅरी पेज (6), सर्जी ब्रिन (7), स्टीव्ह बाल्मर (8) आणि लॅरी एलिसन (9) यांचा समावेश आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे