गोल पोस्ट राष्ट्रीय गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे धमकी दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी गंभीर यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
विविध मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त करून कायम चर्चेत राहणारा माजी क्रिकेटपटू गंभीर हा पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version