अंबड, जालना ३० डिसेंबर २०२३ : जालना जिल्ह्यातील अंबड येथील एकात्मिक बालविकास अधिकारी प्रकल्प कार्यालयासमोर, अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटना आयटक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अधिकाऱ्यांनी काढलेल्या गॅझेट (GR)ची होळी करुन निषेध व्यक्त केला.
सदर अंगणवाडी सेविका एक महिनाभरापासून संपावर आहेत. तरी सरकारने त्यांची दखल न घेता, जी आर काढून अटी लादल्या आहेत. यामुळे एकात्मिक बालविकास अधिकारी प्रकल्प कार्यालयासमोर आयुक्त रुबल मॅडम यांनी काढलेल्या जी आर ची होळी करून संपावरील कर्मचाऱ्यांनी, सरकारच्या प्रती शिंदे सरकार होश मे आव, अजित दादा होश मे आव अश्या घोषणा दिल्या. या सह अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना वतीने पेन्शन आमच्या हक्काची अश्या विविध घोषणा नी परिसर दणाणला सोडला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे