Tata Tiago EV शी स्पर्धा करण्याची तयारी, ही कंपनी आणत आहे स्वस्त इलेक्ट्रिक कार!

पुणे, ७ ऑक्टोबर २०२३ : भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळेच ऑटोमेकर्स या सेगमेंटमध्ये त्यांचे नवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. अलीकडेच टाटा मोटर्सने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईव्ही ही स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. पण आता लक्झरी कार विक्रेते एमजी आणखी स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे.

रशलेन अहवालानुसार, एमजी लवकरच आपली एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार (एंट्री लेबल ईव्ही) भारतीय बाजारपेठेत लॉन्च करू शकते. टाटा मोटर्सकडून नुकत्याच लाँच झालेल्या टियागो ईव्ही पेक्षाही ती स्वस्त असेल असे त्यात म्हटले आहे. टाटा टियागो ईव्ही ची सुरुवातीची किंमत ८.४९ लाख रुपये आहे. अहवालात म्हटले आहे की एमजीची ही छोटी इलेक्ट्रिक कार चाचणी दरम्यान कार पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे. एमजी ची ही इलेक्ट्रिक wuling Air EV वर आधारित असेल. टाटा टियागो ईव्ही कार सिंगल चार्जवर ३१५ किलोमीटर पर्यंतची रेंज देते.

पुढील वर्षी होऊ शकते लाँच

इतर वाहन निर्मात्यांप्रमाणे, एमजी देखील इलेक्ट्रिक कार विभागात आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे आणि कंपनी या छोट्या आणि स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅकद्वारे जोरदार प्रवेश करणार आहे. अहवालात अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे की लक्झरी कार निर्माता कंपनी पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये भारतीय बाजारपेठेत ही छोटी EV लाँच करू शकते. १० ऑक्टोबरपासून कंपनी या कारसाठी बुकिंग्स घेण्यास सुरुवात करू शकते. या कारची डिलीव्हरी पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरू होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा