नवी दिल्ली, दि.१३ जून २०२०: देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. यावेळी पेट्रोल ९०.३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ४.०० रुपये प्रति लिटर दराने महागले आहे.
याबाबत आयओसी या संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ५९ पैशांनी वाढून ७५.१६ रुपये झाली आहे. त्याचबरोबर डिझेलच्या किंमतीत ५८ पैशांची वाढ झाली आहे. आता दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर ७३.३९रुपये केली आहे.
तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल (पीपीएसी) च्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात एकूण तेलाचा वापर १६,५६,५६५ दशलक्ष टनांवर झाला आहे. तो एप्रिलच्या तुलनेत .४४७..४ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही मागणी २३.३ टक्के कमी झाली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: