स्टार्टअप्स आणि भारतीय अर्थव्यवस्थेबाबत जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान…

नवी दिल्ली, २९ एप्रिल २०२३: स्टार्टअप्ससाठी भारत हा जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी इकोसिस्टम आहे. तसेच २०२४ पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी आशा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केली. दिल्ली येथील एका कार्यक्रमात आज ते बोलत होते.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, सरकारद्वारे मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या आज ८४ हजारहून अधिक आहेत. त्यामुळे भारत जागतिक स्तरावर स्टार्टअप्ससाठी तिसरी सर्वात मोठी इकोसिस्टम म्हणून उदयास येत आहे. तसेच २०२४ पर्यंत आम्ही जर्मनीला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची आशा करतो, असे CDS म्हणाले.

जनरल चौहान यांनी यावेळी सरकारच्या औधोगिक धोरणांविषयी बोलताना म्हणाले, मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत सरकारने औधोगिक परवाना मिळण्याची प्रणाली सुलभ केली आहे, एफडीआय मर्यादा वाढली आहे. संशोधन आणि विकास आणि एमएसएमईसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. यासोबतच संरक्षण उत्पादनात खाजगी कंपन्यांना आवश्यक क्षेत्र प्रदान केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा