जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

India-Germany Ties, ५ डिसेंबर २०२२: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बियरबॉक यांच्यात सोमवारी होणाऱ्या चर्चेच्या केंद्रस्थानी भारताचे चीनशी असलेले संबंध आणि युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा प्रभाव हे मुद्दे असतील. बिअरबॉक सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. जर्मन दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, बियरबॉक अशा वेळी भारतात येत आहेत, जेव्हा संपूर्ण जग युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा फटका सहन करत आहे.

अनेक मुद्द्यांवर होईल चर्चा

बर्लिनमधील जर्मनीच्या फेडरल ऑफिसनुसार, बियरबॉक यांच्या पहिल्या भारत भेटीदरम्यान तेल, कोळसा आणि वायूव्यतिरिक्त इंधनाच्या व्यवहारात सहकार्यावर चर्चा केली जाईल. या संदर्भात, बियरबॉक नवी दिल्लीच्या आसपासच्या ग्रामीण भागात अक्षय ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करतील.

भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाणार

जर्मनीचे परराष्ट्र मंत्री भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयालाही भेट देणार आहेत. महिला हक्कांबाबत नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि अशासकीय संस्थांमधील लोकांचीही त्या भेट घेणार आहेत.

जर्मनी आणि भारत यांच्यातील सामरिक युती

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनी आणि भारत यांच्यात सामरिक युती आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही पक्ष द्विपक्षीय संबंध आणि समान हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, भारत आणि जर्मनीने २०२१ मध्ये त्यांच्या राजनैतिक संबंधांचा ७० वा वर्धापन दिन साजरा केला. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहाव्या इंडो-जर्मन आंतर-सरकारी परिषदेत सहभागी होण्यासाठी बर्लिनला गेले होते. याशिवाय सहभागी देश म्हणून G-7 देशांच्या बैठकीत सहभागी झाले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा